शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus : राजस्थानच्या भीलवाडात कोरोनाचे सहा रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 5:55 AM

कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्यानंतर भीलवाडात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

भीलवाडा : राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या २७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात तीन डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यानंतर बाजारपेठा, जिल्ह्याची सीमा बंद करण्यात आली.कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्यानंतर भीलवाडात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात खळबळ उडाली असून बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. आरसी व्यास कॉलनीस्थित बृजेश बांगड मेमोरियल हॉस्पिटल बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या खासगी रुग्णालयात भरती असलेल्या जवळपास ३५ रुग्णांपैकी काही रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. तर, ५ ते १० गंभीर रुग्णांना वेगवेगळ्या वॉर्डात ठेवले आहे. त्यांना आता अन्य हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. दुपारनंतर बांगड हॉस्पिटलच्या परिसरात एक किमी क्षेत्रात संचारबंदी लागू केली आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे.हॉस्पिटलचा बेजबाबदारपणाबांगड हॉस्पिटलमध्ये गत आठवड्यात बापूनगरचा एक संशयित रुग्ण भरती झाला होता. न्यूमोनियाचा रुग्ण समजून त्याच्यावर उपचार केले गेले. हा रुग्ण नंतर जयपूरमध्ये एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर भीलवाडात आला होता. त्यानंतरच त्याचा घरीच मृत्यू झाला. त्यानंतर एक एक जण महात्मा गांधी हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले.चीनमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाहीबिजिंग : चीनमध्येच राहाणाऱ्या लोकांमध्ये सलग दुसºया दिवशी शुक्रवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. ही माहितीतेथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे.चीनमध्ये तीन महिन्यांपासून कोरोनाच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. हुबेई प्रांत व वुहान शहरात या साथीचा उगम झाला असून नंतर ती झपाट्याने जगभरातील अनेक देशांमध्ये पसरली. कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने वुहान व हुबेई प्रांतातील सर्व व्यवहार, वाहतूक बंद केलीहोती. त्यामुळे तिथे आता या विषाणूचा फैलाव आटोक्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थान