मुंबई - कोरोनाकाळात भारतामधील श्रीमंत नागरिकांमध्ये एक वेगळाच ट्रेंड दिसून येत आहे. येथील कोट्यधीश, अब्जाधीश भारतीय नागरिक देश सोडून बाहेरील देशांचे नागरिकत्व स्वीकारत आहेत. ग्लोबल वेल्थ मायग्रेशनच्या रिव्ह्यू रिपोर्टनुसार केवळ २०२० मध्येच भारतातील ५ हजार कोट्यधीशांनी परदेशात जाऊन नागरिकत्व स्वीकारले आहे. आता हा ट्रेंड कायम असून, कोरोना महामारीच्या काळात त्याची वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. (So rich Indians leave Coronavirus and accept foreign citizenship) उच्च उत्पन्न गटात मोडणारे भारतीय उद्योगपती आपल्या मालमत्तेमध्ये वैविध्य राखण्यासाठी सुरक्षित आणि सोप्या गुंतवणूक पर्यायांकडे पाहत आहे. कोरोना महमारीच्या काळात दिसून आलेली आरोग्य सुविधांबाबतची अनिश्चितता आणि हल्लीच हेवी टॅक्स नियम लागू झाल्याने कोट्यधीशांचे देशातून पलायवन वाढले आहे. तसेच प्रभावी भारतीय आपल्या कुटुंबाला चांगले आणि सुरक्षित राहणीमान देण्यासाठी बाहेरील देशांमध्ये जात आहेत. तसेच परदेशातून आपली आर्थिक गुंतवणूक चांगल्या प्रकारे हाताळता येईल असा त्यांना विश्वास आहे.
दरम्यान, लंडनस्थित नागरिकत्व सल्लागार फर्म सीएस ग्लोबल पार्टनरच्या दाव्यानुसार श्रीमंत भारतीयांमध्ये गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत परकीय नागरिकत्वाचा शोध वेगाने वाढला आहे. भारतामध्ये ६ हजार ८८४ अतिश्रीमंत नागरिक आहेत. यामधील ११ अब्जाधीश आहेत. कोरोना महामारीच्या काळात ४० अब्जाधीश वाढले आहेत. आता देशामध्ये एकूण १५३ अब्जाधीश झाले आहेत. आता देशात एकूण १५३ अब्जाधीस आहेत. तसेच केवळ २०२० मध्ये देशातून पाच हजार करोडपटी हे परदेशात गेले आहेत.
भारतीय वकील आणि मिनियनायर ऑन द मुव्हचे लेखल प्रशांत अजमेरा यांनी भारत सरकार कशाप्रकारे श्रीमंत भारतीयांना परदेशात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देत आहे हे उलगडून सांगितले आहे. सरकारच्या बदलेल्या धोरणांचा या लोकांना लाभ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.