नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’दरम्यान राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर), राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) याच्या निषेधार्थ टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून तसेच घोषणा देऊन निषेध नोंदविण्याचा निर्णय दिल्लीतील काही लोकांनी घेतला आहे. काही संघटना त्यासाठी कार्यरत झाल्या आहेत.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने रविवारी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ घोषित केला आहे. यादरम्यान सायंकाळी ५.०० वा. आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा देणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.पंतप्रधानांच्या आवाहनास लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असे मानले जात असतानाच काही संघटना याचा सरकारविरोधातील राग व्यक्त करण्यासाठी वापर करणार असल्याचे समोर आले आहे. रविवारी सायंकाळी ५.०० वा. लोकांनी एनआरसी, एनपीआर आणि सीएए यांच्या विरोधात आपापल्या घराच्या बाल्कन्या, खिडक्या आणि दरवाजातून निषेध नोंदवावा, असे आवाहन ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’ या सामाजिक संस्थेने आवाहन केले आहे.खान यांनी सांगितले की, विषाणूचा धोका दूर करण्यास सरकारने प्रथम प्राधान्य द्यायला हवे. या मुद्यावर आपण सारे एक आहोत. सकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत घरातच थांबण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. आमची त्यांना विनंती आहे की, वायव्य दिल्लीतील दंगलीत घरे गमावून मदत छावण्यात राहणाºया लोकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे.सेवा देणाऱ्यांचे आभार‘युनायटेड अगेन्स्ट हेट’चे संचालक नदीम खान यांनी सांगितले की, सर्वप्रथम आम्ही कोरोना रुग्णांची सेवा करणाºया, तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाºया आमच्या बहीण-भावांचे आभार मानू.त्यानंतर एनआरसी आणि सीएए यांचा निषेध करू. त्यासाठी आम्ही आमच्या बालकन्या आणि खिडक्यांत फलक झळकावू. १ एप्रिलपासून एनपीआर सुरू करण्याचा निर्णय सरकारने तात्काळ मागे घेण्याची मागणी आम्ही करू.
Coronavirus : काही लोक ‘कर्फ्यू’दरम्यान करणार सीएएचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:35 AM