शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Coronavirus: ...तर मौलाना साद यांच्याविरोधात होणार हत्येचा गुन्हा दाखल, दोन नातेवाईकही कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 9:00 AM

तबलिगी जमातचे लोक मार्चमध्ये आयोजित कार्यक्रमात बेजबाबदारपणे वागले आहेत, त्यामुळे देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली.

नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातचे प्रमुख असलेल्या मौलाना साद कांधलवी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही प्रकारच्या खून प्रकरणातील गुन्ह्याइतकाच हा कलम प्रभावी आहे. निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या जमातच्या कार्यक्रमात सहभागी काही लोकांचा कोरोना व्हायरसनं मृत्यू झाला आणि जमातमध्ये वेगानं याचं संक्रमण पसरल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कायदेशीर तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, तपासादरम्यान गंभीर गुन्हे आढळल्यास पोलीस या प्रकरणात आणखी कठोर कलमे समाविष्ट करू शकतात. साद आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३०४ सामील करण्यात आलं आहे. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी यासंदर्भात वृत्तसंस्था आयएएनएसला सांगितले की, 'हे ३०४ ऐवजी कलम ३०२चे स्पष्ट प्रकरण आहे. तबलिगी जमातचे लोक मार्चमध्ये आयोजित कार्यक्रमात बेजबाबदारपणे वागले आहेत, त्यामुळे देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली. या कार्यक्रमातून कोरोनाचं संक्रमण पसरण्याची त्यांना कल्पना होती. दोषी ठरल्यास जन्मठेपेची शिक्षा रोहतगी म्हणाले की, या प्रकरणात त्वरित कारवाई केली गेली पाहिजे. मौलवींना शेवटचं २८ मार्च रोजी पाहिलं गेलं होते. नंतर त्यांनी एका ऑडिओ मेसेजद्वारे एकांतवासात असल्याचा दावा केला होता. कलम ३०४ नुसार दोषी ठरवलेल्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते. यापूर्वी मौलाना साद यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांत जामीन मिळण्याची शक्यता होती. परंतु आता कलम ३०४ समाविष्ट केल्याने साद यांना जामीन मिळणे कठीण झाले आहे. खून प्रकरणातील एखाद्या गुन्हाइतकंच हे कलम प्रभावी असल्याचं वरिष्ठ वकील ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले. यामध्ये कोणालाही मारण्याचा हेतू नसला तरी असे कृत्य केले आहे की, जे इतके धोकादायक आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे भाटी यांनी सांगितले. या कटात त्यांची भूमिका असल्याचा आरोप सिद्ध झाल्यास आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी आणखी कठोर कलमे जोडली जाऊ शकतात.साद यांच्या सासरच्या मंडळींपैकी दोघे कोरोना पॉझिटिव्हउत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यात तबलिगी जमात प्रमुख मौलाना साद यांच्या दोन नातेवाईकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. मौलाना साद यांच्या दोन नातेवाईकांच्या नमुन्यांमध्ये कोरोनाची पुष्टी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांना विलगीकरण कक्षात हलवलं आहे.  तसेच अन्य ८ जणांनाही क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती सहारनपूरचे जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांनी दिली आहे. संसर्ग झालेल्या दोन व्यक्ती मौलाना साद यांच्या सासरकडची आहेत. लॉकडाऊनपूर्वी ते दोघेही मरकजमध्ये थांबले होते. ते काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेवरून परतले होते. आता या दोघांच्या संपर्कात अजून किती लोक आले आहेत, याचा प्रशासन शोध घेत आहे. 

भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३०४ला कायद्याच्या भाषेत "कल्पेबल होमिसाईड" असेही संबोधले जाते. ‘केल्या जाणाऱ्या कृतीमुळे संबंधिताचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही ज्ञात वा अज्ञातपणे केलेले मृत्यूला कारणीभूत ठरणारे कृत्य’ या कलमांतर्गत गुन्हा ठरते. खुनाच्या ३०२ कलमापासून हे कलम या अर्थाने वेगळे आहे. सदर कलमांतर्गतचा खटला चालविण्याचे अधिकार सत्र न्यायालयाला आहेत. या कलमात पोलिसांना जामीन देण्याचे अधिकार नाहीत. दोष सिद्ध झाल्यास जन्मठेप वा तुरुंगवास तसेच दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या