नवी दिल्ली - चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला असून अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा आजारा वेगाने पसरत चालला आहे. आतापर्यंत जगात 11 लाख 67 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 62 हजार 691 जण मृत्युमुखी पडले आहेत. जगातील सुमारे 200 देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये 8 लाख 50 हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील 40 हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच प्रेरणादायी घटना समोर आली आहे.
कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावे यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सने तब्बल 250 किमीचा प्रवास केल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये ही घटना घडली आहे. विनोथिनी असं या 25 वर्षीय नर्सचं नाव असून ती 8 महिन्यांची गर्भवती आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तिने तामिळनाडूतील तिरुचिरा ते रामनाथुरमपर्यंत तब्बल 250 किमी अंतर प्रवास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोथिनी ही तामिळनाडूतील एका खासगी रुग्णालयात काम करीत होती. 1 एप्रिल रोजी रामनाथपुरम येथील स्वास्थ सेवा संयुक्त निर्देशक यांचा कॉल आला. कोरोना रुग्णांवर उपचारासंदर्भात तो कॉल होता. विनोथिनीने वेळ वाया न घालवता प्राथमिक स्वास्थ रुग्णांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल 250 किमी प्रवास करुन ती त्या रुग्णालयात पोहोचली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3000 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी एका पोलीस कॉन्स्टेबलने तब्बल 450 किमी पायी प्रवास केल्याची कौतुकास्पद गोष्ट समोर आली होती. चालून, चालून पाय सूजले मात्र तरीही ते कामावर हजर झाले. दिग्विजय शर्मा असं पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून सर्वांनी त्यांच्या जिद्दीला सलाम केला. दिग्विजय राजगढ जिल्ह्यातील पचोर ठाण्यात काम करतात. काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर गेले होते. मात्र त्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांनी पायीच कामावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तब्बल 450 किमी अंतर पायी प्रवास केला.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus कोरोनाचे बुमरँग चीनवरच उलटणार; जगासाठी भारत 'बाजीगर' ठरणार
CoronaVirus हाहाकार! जगभरात ११ लाखांहून अधिक रुग्ण; ६२ हजार बळी
CoronaVirus : अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाखांहून अधिक, दुबईत लॉकडाऊनचा निर्णय