हैदराबाद: कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं असून, अमेरिकेतही हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता आणि विकसित असलेल्या देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यानं जगासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. अमेरिकेत न्यू जर्सी येथे राहणाऱ्या तेलंगणातील एका महिलेनं भारत कोरोनाला रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. त्यानंतर तिच्यावर अमेरिकाविरोधात विधान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील स्वाती देवीनेनी हिने ट्विट करून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं होतं. त्याविरोधात एका एनआरआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे राहणा-या श्रावण नावाच्या एनआरआयने स्वाती देवीनेनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रावणच्या म्हणण्यानुसार, देवीनेनी हिने एक व्हिडीओ ट्विट केला होता, ज्यात अमेरिकीविरोधी वक्तव्यं करण्यात आली आहेत. या व्हिडीओमध्ये स्वाती देवीनेनी म्हणत आहे की, अमेरिकेसारखा शक्तिशाली देश कोरोना विषाणूसारखे साथीचे रोग रोखण्यात अपयशी ठरला आहे, तर भारताने त्यावर मात केली आहे.
Coronavirus: कोरोनाविरोधातील भारताच्या लढ्याचं 'तिनं' केलं कौतुक; थेट अमेरिकेत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 3:51 PM