शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus: टेन्शन! देशातील ९ राज्यात रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्राला दिलासादायक परिस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 5:24 AM

मिझोरामनंतर केरळमध्ये देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे. येथे १४ टक्के वेगाने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत

ठळक मुद्देमिझोरामनंतर केरळमध्ये देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे ३.५ कोटी लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये आतापर्यंत ४६.९४ लाख लोक संसर्गाने प्रभावित झाले आहेत.देशातील नागरिकांना कोरोना लसीचे ९० कोटी डोस देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा शनिवारी ओलांडण्यात आला.

विकास झाडे 

नवी दिल्ली : दसरा, दिवाळी जवळ येत असताना देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये २४३५४  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मिझोराम, हरियाणा, गुजरात, झारखंड, गोवा, हिमाचल, मध्यप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात रुग्ण वाढत आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक प्रकरणे आणि मृत्यू

मिझोरामनंतर केरळमध्ये देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे. येथे १४ टक्के वेगाने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तथापि, दररोज बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या बाबतीत केरळ अव्वल आहे. येथे शुक्रवारी देशात सर्वाधिक १३ हजार ७६७ लोक संक्रमित झाले. केरळमध्येच कोरोनाचे बहुतेक रुग्ण मृत्यू पावत आहेत. शुक्रवारी येथे ९५ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २५ हजार १८२ लोकांचा मृत्यू झाला आहे. ३.५ कोटी लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये आतापर्यंत ४६.९४ लाख लोक संसर्गाने प्रभावित झाले आहेत. यापैकी १.४२ लाख रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ४५ लाख लोक बरे झाले आहेत.

९० कोटी डोसचा टप्पा पूर्ण

देशातील नागरिकांना कोरोना लसीचे ९० कोटी डोस देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा शनिवारी ओलांडण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही घोषणा केली. कोरोना लसीकरण मोहिमेची देशामध्ये १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. त्यानंतर ही मोहीम आता वेगाने राबविली जात आहे. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे की, तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय विज्ञान’ असा नारा दिला होता. सध्याच्या काळात कोरोना लसीच्या संशोधनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय अनुसंधान’ असा नारा दिला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर २ फेब्रुवारीपासून पोलीस, सुरक्षा दले, महापालिका कर्मचारी आदी कोरोना योद्ध्यांना लस देण्यास प्रारंभ झाला.

लसीकरणाचे टप्पे१६ जानेवारीपासून पहिला टप्पा -  आरोग्यसेवकांना लस देण्यास प्राधान्य.१ मार्चपासून दुसरा टप्पा - ६० वर्षे वयावरील नागरिक, एकापेक्षा अधिक व्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात.१ एप्रिलपासून तिसरा टप्पा - ४५ वर्षे वयावरील सर्वांना लस१ मेपासून चौथा टप्पा - १८ वर्षे वयावरील सर्वांना लस.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस