CoronaVirus : टेन्शन पुन्हा वाढतय! देशभरात 24 तासांत 42,530 नवे रुग्ण; अर्ध्यावर रुग्ण 'या' एकट्या राज्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:14 AM2021-08-04T09:14:59+5:302021-08-04T09:17:11+5:30
देशातील 8 राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसारखे निर्बंध आहेत. यांत पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, मिझोरम, गोवा आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. मागील लॉकडाऊन प्रमाणेच येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. (Corona Virus In India)
नवी दिल्ली - देशातील नव्या कोरोना रुग्ण संख्येत एका दिवसाच्या घसरणीनंतर पुन्हा मोठी वाढ झाली आहे. देशात मंगळवारी 42,530 रुग्ण आढळले. सोमवारी 30,029 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत 36,552 संक्रमित लोकांनी कोरोनावर मात केली असून 561 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, सक्रिय रुग्ण संख्येत 5,396 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 4.04 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (CoronaVirus: Tensions rise again; 42,530 new patients across the country in 24 hours, Half of the patients are in kerala)
सध्या केरळने संपूर्ण देशाचेच टेन्शन वाढवले आहे. मंगळवारी येथे 23,676 नवे रुग्ण समोर आले आहेत. सोमवारी हा आकडा 13,984 एवढा होता. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येत 9,959 ची वाढ झाली आहे. येथे सध्या 1.72 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आकडेवारीच्या माध्यमाने समजून घ्या, देशातील कोरोना स्थिती -
गेल्या 24 तासांत एकूण नवे रुग्ण - 42,530
गेल्या 24 तासांत एकूण बरे झालेले रुग्ण - 36,552
गेल्या 24 तासांत एकूण मृत्यू - 561
आतापर्यंत एकूण संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या - 3.17 कोटी
आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या - 3.09 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू - 4.25 लाख
उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या - 4.04 लाख
8 राज्यांत लॉकडाउन सारखे निर्बंध -
देशातील 8 राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसारखे निर्बंध आहेत. यांत पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, मिझोरम, गोवा आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. मागील लॉकडाऊन प्रमाणेच येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाउन -
देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाऊन आहे. येथे निर्बंधांसह सूट आहेत. यांत छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे.
केरळनं वाढवलंय टेन्शन -
केरळमध्ये मंगळवारी, 23,676 लोक संक्रमित आढळले. 15,626 लोक बरे झाले आहेत, तर 148 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34.49 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 32.58 लाख लोक बरे झाले आहेत, तर 17,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे 1.72 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अशी आहे महाराष्ट्राची स्थिती -
महाराष्ट्रात मंगळवारी एकूण 6,005 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर 6,799 रुग्ण बरे झाले असून 177 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 63.21 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यांपैकी 61.10 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.33 लाख लोक मरण पावले आहेत. सध्या राज्यात 74,318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.