नवी दिल्ली - जवळपास सव्वा दोन महिन्यांपासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि अन्य उपाययोजनांनंतरही देशातील कोरोना विषाणूचे संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संकटाला गांभीर्याने न घेतल्याने देशात कोरोनाच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा १ फेब्रुवारी रोजीच बंद केली असती तर देशात कोरोना पसरलाच नसता, असा दावा काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी केला आहे.
अधीररंजन चौधरी म्हणाले की, कोरोनाबाबत केंद्र सरकार आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. ३० जानेवारी रोजी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी देशातील आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली असती तर देशात कोरोना विषाणू पसरला नसता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीमुळे कोरोना फैलावला आहे. गरीब आणि मजुरांची मदत करण्यामध्ये मोदी अपयशी ठरले आहेत. आम्ही लॉकडाऊनला पाठिंबा दिला होता. मात्र सरकारने घाईगडबडील लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे प्रवासी मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत मजूर रस्त्यावर असले तर आम्ही मोदींचे कौतुक करायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी
क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...
शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी