Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:10 AM2020-04-01T10:10:02+5:302020-04-01T10:19:41+5:30

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 1200 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

coronavirus these nine places including maharashtra delhi became hotspot for covid19 SSS | Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी

Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी

Next

नवी दिल्ली - जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 42,158 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 8,58,892 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,78,100 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जागतिक महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसमुळे इटलीत हाहाकार माजला आहे. चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 1200 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

कोरोना व्हायरस भारतात कम्यूनिटी ट्रान्समिशन स्टेजला गेल्याची चर्चा होती. मात्र, आरोग्य मंत्रालयाने याचे खंडन केले आहे. यासंदर्भात बोलताना, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी, सध्या देशात कोरोना कम्यूनिटी ट्रान्समिशन नव्हे तर लोकल ट्रान्समिशन स्टेजलाच असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र देशात असे नऊ हॉट स्पॉट्स आहेत, ज्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. या ठिकाणी कम्युनिटी ट्रान्समिशन असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या भागात विशेष खबरदारी घेतली जात आहे. 

दिल्ली - 120

दिलशाद गार्डन - 10 मार्चला एक महिला सौदी अरेबियातून एका मुलासह भारतात परतली. काही दिवसांनंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर या महिलेचा मुलगा, नातेवाईक ज्यांनी तिला विमानतळावर नेले ती व्यक्ती आणि डॉक्टर यांच्यासह 11 लोक संसर्गित असल्याचे आढळून आले.

निजामुद्दीन - मरकज येथे जवळपास 1700 लोक धार्मिक कार्यासाठी जमले होते. त्यापैकी बरेच जण परदेशातून देखील आले होते ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत 24 जणांना संसर्ग झाला आहे आणि 300 पेक्षा जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली  आहेत. अनेक लोक येथून इतर राज्यात गेल्याची माहिती मिळत आहे.

राजस्थान - 93

भीलवाडा - राजस्थानच्या भीलवाडामध्ये 10-15 दिवसांपूर्वी अचानक कोरोनाचे रुग्ण वाढले. भीलवाड्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कोरोना कसा पसरला हे अद्याप कळलेले नाही. आजारी असल्याने एका 73 वर्षीय व्यक्तीला बांगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येत बिघडल्याने त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे कोरोना संसर्ग आढळला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बांगर रुग्णालय आणि महात्मा गांधी रुग्णालयात वृद्धांच्या संपर्कात आलेल्या अनेक नर्सिंग स्टाफ सदस्यांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

गुजरात - 73

अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबाद हे राज्यातील सर्वात मोठे कोरोना विषाणूजन्य संक्रमित क्षेत्र बनत आहे. येथे विषाणूचा कसा प्रसार झाला हे एक कोडं आहे. काही स्थानिक व्यक्ती परदेशातून येत असल्यामुळे हा विषाणू येथे पसरत असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेसह युरोपच्या बर्‍याच देशांमध्ये अहमदाबादचे लोक मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. हे लोक सुट्टीच्या वेळी घरी येतात.

महाराष्ट्र - 302

महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वाधिक प्रकरणे मुंबई व पुणे येथून आली आहेत. या दोन ठिकाणी मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक आहे. परदेशात प्रवास करणारे लोक येथे संक्रमण पसरवण्याचे सर्वात मोठे कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

केरळ - 215

केरळच्या कासारगोड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या  सर्वाधिक आहे. त्यामुळे हे ठिकाण हाय अलर्टवर आहे. कासारगोडची लोकसंख्या 13 लाख असून जवळपास प्रत्येक घरातील एक सदस्य अरब देशांमध्ये काम करत आहे.

उत्तर प्रदेश- 101

नोएडा - उत्तर प्रदेशातील सर्वाधिक प्रकरणे नोएडा आणि मेरठमधून नोंदवली गेली आहेत. एका टुरिस्ट गाईडला कोरोनाची लागण झाली. यानंतर एका कंपनीत 19 लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. यामुळे सरकारची चिंता आणखीनच वाढली आहे.

मेरठ - मेरठमध्ये कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन झाले असून हे चिंताजनक आहे. मेरठमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल 13 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच अनेकांची चाचणी घेण्यात आली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ...म्हणून 'त्या' जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन' 

coronavirus : अमेरिका, युरोप कोरोनसमोर हतबल, जगभरात कोरोनामुळे 42 हजार जण मृत्युमुखी

दिल्लीतील संमेलनातून देशभर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव; महाराष्ट्रातून १०९ भाविक झाले होते सहभागी

Coronavirus: चिंताजनक! एकाच दिवशी राज्यात नवे ८२ रुग्ण वाढले; चार दिवसांत मुंबईत ५९ रूग्ण

 

Web Title: coronavirus these nine places including maharashtra delhi became hotspot for covid19 SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.