नवी दिल्ली - कोरोनाचा वाढत जोर पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आजपासून 21 दिवस लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र, लॉकडाऊन संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, ज्याचे उत्तर शासन-प्रशासनाच्या माध्यमांद्वारे सतत दिले जात आहे, पंतप्रधान स्वत: प्रत्येक कामांवर लक्ष ठेवून आहेत.
अशा परिस्थितीत बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमिताभ बच्चन यांचे ट्विट पुन्हा ट्विट केले आहे. वास्तविक, अमिताभ यांनी म्हटले आहे की, चीनने केलेल्या संशोधनाचा हवाला देऊन हे ट्विट केले आहे. आपला संपूर्ण देश कोरोनाविरोधात झुंज देत असूूून चीनच्या संशोधनात दिसून आले आहे की, कोरोना विषाणू मानवी विष्ठेमध्ये कित्येक आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो आणि विष्ठेवर बसलेली माशी जर फळे, भाज्या अथवा अन्य कोणत्याही खाण्यापिण्यासारख्या पदार्थावर बसली तर ते दूषित होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, म्हणूनच उघड्यावर शौचास बसू नका आणि शौचालयाचा वापर करा. आपल्या घरात सुरक्षित रहा, असे या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओतून अमिताभ यांनी आवाहन केले आहे.
तसेच दरवाजा बंद, तो बीमरी बंद असं म्हणत उघडयावर शौच करू नका, आपत्कालीन वेळेशिवाय घराबाहेर पडू नका आणि घरीच बसा असे बहुमूल्य मार्गदर्शन अमिताभ यांनी तमाम देशवासियांना केले आहे.