शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

दिलासादायक!  कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 6:28 AM

भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीबाबत आयसीएमआरचे संचालक डाॅ. बलराम भार्गव यांनी लिहिलेल्या ‘गोईंग व्हायरल’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. रणदीप गुलेरिया बोलत होते. डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोना संसर्गात खूप वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी तीव्र लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्याने बूस्टर डोस देण्याचीही आवश्यकता नसून लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याची गरज असल्याचे गुलेरिया म्हणाले. भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीबाबत आयसीएमआरचे संचालक डाॅ. बलराम भार्गव यांनी लिहिलेल्या ‘गोईंग व्हायरल’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. रणदीप गुलेरिया बोलत होते. डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोना संसर्गात खूप वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही. सिरो-पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही वाढलेले आहे. सध्या बूस्टर डोस देण्याची गरज नाही. कदाचित भविष्यात त्याची आवश्यकता भासू शकेल. लसीकरणाची मोहीम वेगाने राबविली जात असून, कोरोनामुळे प्रकृती गंभीर होण्याच्या, रुग्णालयात दाखल होण्याच्या किंवा मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे निरीक्षणही गुलेरिया यांनी नोंदवले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस