लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाबाधितांच्या संख्येत केरळात वाढ होऊ लागल्याने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट शिखर गाठेल, असेही अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. लहान मुलांना तिसऱ्या लाटेपासून अधिक धोका असल्याचे बोललेत जात आहे. मात्र, नव्या संशोधनानुसार लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका नसल्याचे स्पष्ट होत आहे. लॅन्सेट या मासिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
काय आढळले संशोधनात?- ज्या मुलांना कोरोना होतो ती सहा दिवसांत बरी होतात. - चार आठवड्यांहून अधिक काळ कोरोनाची लक्षणे राहिलेल्या मुलांचे प्रमाण अवघे ४ टक्के होते.- लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे अल्पकाळ टिकतात, असे अहवालात नमूद आहे.- १७३४ मुलांचा डेटा या अभ्यासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आला होता.
कोणी केले संशोधन?- लंडन येथील किंग्ज कॉलेज येथील संशोधकांनी ‘झो कोविड’ स्टडी स्मार्टफोन ॲपचा वापर करून लहान मुलांवर कोरोनाच्या लक्षणांचा अभ्यास केला. - या ॲपवर १७ वर्षांपर्यंतच्या अडीच लाख मुलांचा डेटा उपलब्ध होता. संशोधकांच्या चमूने १ सप्टेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत संकलित करण्यात आलेल्या अहवालांवर लक्ष केंद्रित केले.
निष्कर्ष काय? लहान मुलांमध्ये कोरोना फार काळ न टिकता सरासरी सहा दिवसांत बरा होतो.कोरोनाची तीव्र बाधा होत नाही. सौम्य लक्षणे लहान मुलांमध्ये आढळतात. ते लवकर बरे होऊ शकतात.मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले चार आठवड्यांपर्यंत बरे झाले.