देशाची राजधानी दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी दोन आकडी असलेली कोरोना रुग्णसंख्या अचानक काही हजारांवर गेल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना सोबत जगावे लागेल असे पहिला लॉकडाऊन उठविताना म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीची पावले तिसऱ्या लाटेमध्ये हळूहळू लॉकडाऊनकडे पडू लागली आहेत. थोड्याच वेळात अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहेत, परंतू त्याच्या तासभर आधीच दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंटने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला ही कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने ही कार्यालयेच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.