मदूराई - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 12,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच एक तामिळनाडूमधील धक्कादायक घटना समोर आली आहे.
तामिळनाडूच्या मदुराईमध्ये बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मदुराईतील एका बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक उपस्थित होते. याप्रकरणी लॉकडाऊनचे उल्लंघन केलेल्या तब्बल 3 हजार लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड गर्दी जमली होती. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत सुमारे दोन लाख एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. तर दीड लाखाहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. मास्क न घालता बाहेर पडणाऱ्यांना 100 रुपये दंड आकारला जाईल आणि त्याचप्रमाणे वाहनचालकांचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत 414 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण 12,380 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 99 जणांचा तर देशात 37 जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट!
Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार
Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्...
Coronavirus : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे'