नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सुरू असलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी, असंसुद्धा मोदींनी सांगितलं आहे. मोदींनी आज जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. कठोर पावलं उचलावी लागणार आहेत, तसेच नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं आहे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कोणत्याही परिस्थितीत वाढू द्यायचा नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हॉटस्पॉटबाबत अधिक सतर्कता बाळगावी लागेल, अशा सूचनाही मोदींनी नागरिकांना केल्या आहेत.20 एप्रिलपर्यंत कोरोना लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे. जी ठिकाणे सुरक्षित असतील तिथे थोडी शिथिलता मिळेल. उद्या सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. 20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन, ज्या क्षेत्रांनी आपलं हॉटस्पॉट वाढू दिलेलं नाही, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. जेव्हा देशात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता त्याच्या आधीपासूनच आपण देशाच्या बाहेरून येणाऱ्या लोकांची टेस्टिंग सुरू केली होती. जगातल्या बड्या बड्या राष्ट्रांची स्थिती पाहिल्यास भारताची स्थिती खूप नियंत्रणात आहे, असंसुद्धा मोदींनी स्पष्ट केलं आहे.
CoronaVirus: 20 एप्रिलनंतर 'या' ठिकाणचा लॉकडाऊन शिथील होईल, पण...; पंतप्रधानांचे महत्त्वाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 10:49 AM
स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हॉटस्पॉटबाबत अधिक सतर्कता बाळगावी लागेल, अशा सूचनाही मोदींनी नागरिकांना केल्या आहेत.
ठळक मुद्देमोदींनी आज जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. कठोर पावलं उचलावी लागणार आहेत, तसेच नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं आहे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कोणत्याही परिस्थितीत वाढू द्यायचा नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय आहे.