नवी दिल्ली : भारतातकोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणखी दोन राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक आणि पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे.
कर्नाटकमधील बंगळुरू येथील एका आयटी इंजिनीअरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हा कर्नाटकातील पहिला रुग्ण आहे. तर पंजाबमध्येही कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण इटलीहून भारतात परतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
"कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह असलेला हा रुग्ण पत्नी आणि मुलीसह यूएसमधून 1 मार्चला भारतात आला. 5 मार्चपासून त्याच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आली. टेस्ट केल्यानंतर कोरोना व्हायरसची त्याला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या इतर व्यक्तींनाही वैद्यकीय देखरेखित ठेवण्यात आले आहे," कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
याआधी केरळच्या एर्नाकुलम येथे आज एका 3 वर्षाच्या मुलालाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. या मुलाचे कुटुंबीय नुकतेच इटलीहून परतले होते. या बालकाला एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये आतापर्यंत 9 कोरोना व्हायरसचे रुग्ण आहेत.
दरम्यान, आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
आणखी बातम्या...
ज्योतिरादित्य शिंदेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला घोर, दिल्ली, भोपाळमध्ये बैठकांना जोर
योगी सरकारला हायकोर्टाचा धक्का, दंग्यातील आरोपींचे पोस्टर्स हटवण्याचे आदेश
VIDEO: जम्मू-काश्मीरच्या पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय!
'कधीही प्रकाशात न आलेल्या पक्षाने शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे'