नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 7000 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून हजारो लोकांना त्याची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 147 पर्यंत पोहोचली आहे.
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आंध्र प्रदेशनमध्ये 1, दिल्लीमध्ये 10, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 11, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 42, ओडिशामध्ये 1, पंजाबमध्ये एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या रोगानं पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे. सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 28 वर्षीय महिला फ्रान्स व नेदरलँड या देशांत प्रवास करून पुण्यात आली आहे. त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची तपासणी अहवालातून समोर आल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18वर पोहोचली असून, राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 42 झाला आहे. कोरोना विषाणूचा पहिला बळी काल मुंबईत गेला. दुबईहून परतलेल्या एका 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि आता पुण्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42 झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या
Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण
Coronavirus: सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क
Coronavirus : कोरोनानं लष्करातील जवानही संक्रमित; देशातील रुग्णांची संख्या 140वर
MP Crisis: ‘माझ्या हातात बॉम्ब नाही, पिस्तूल नाही आणि शस्त्रे नाहीत तरीही पोलिसांनी रोखलं’