नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३६ वर पोहोचली आहे. त्यात ३२ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामध्ये इटलीचे १७, फिलिपिन्सचे २, ब्रिटनचे २, कॅनडा, इंडोनेशिया, सिंगापूरच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.भारतात मरण पावलेल्यांची संख्या ५वर पोहोचली आहे. यात दिल्ली, कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र आदी भागांतील रुग्णांचा समावेश आहे. दिल्लीत कोरोनाचे १७ रुग्ण आढळले असून त्यात एका विदेशी नागरिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये १९ रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये ५२ रुग्ण असून त्यात ३ विदेशी नागरिक आहेत. केरळमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा २८वर पोहोचला असून त्यात २ विदेशी आहेत. कोरोनाची बाधा कर्नाटकमध्ये १५, लडाखमध्ये १०, जम्मू-काश्मीरमध्ये ४, तेलंगणामध्ये १६ जणांना झाली आहे. राजस्थानात २ विदेशी नागरिकांसह ७ जणांना, तामिळनाडूत ३ तर आंध्र प्रदेशमध्ये २ जणांना लागण झाली आहे. ओडिशा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, पुडुचेरी, चंदीगढ, पंजाबमध्ये प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त आहे. हरयाणात १२ जणांचा बाधित असून त्यात १४ विदेशी आहेत.इटलीच्या नागरिकाचा मृत्यूकोरोनाच्या संसर्गातून बरा झाल्याचा झालेला इटलीमधील एक नागरिक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी रात्री जयपूर येथील फोर्टिस रुग्णालयात मरण पावला. त्याचे वय ६९ वर्षांचे होते. तो व त्याची पत्नी दोघेही भारतात पर्यटनाला आलेले होते.ते कोरोनाग्रस्त आढळून आल्यानंतर त्यांच्यावर एसएमएस वैैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. हे दोघेही कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले होते. त्या दांपत्यापैैकी पुरुष रुग्णाला एसएमएस रुग्णालयातून फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पत्नीच्या प्रकृतीत मात्र सुधारणा झाली आहे.कोरोनाचा सामूहिक संसर्ग नाही - डॉ. हर्षवर्धनदेशात कोरोना विषाणूचा सामुहिक संसर्ग अद्याप कोणालाही झालेला नाही असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सांगितले. करोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असेही त्यांनी सांगितले.काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी लोकसभेतील शून्य प्रहरात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना विषाणूची साथ रोखण्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन सरकार घेत आहे. कोरोनाबाबत संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांच्याही आम्ही संपर्कात आहोत.तज्ज्ञांकडून मिळत असलेल्या माहितीचा कोरोनाची साथ रोखण्यासाठी सरकार योग्य प्रकारे वापर करत आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेकडून कोरोना विषाणूच्या साथीबाबत संशोधन सुरू आहे. तसेच केंद्र सरकार जागतिक आरोग्य संघटनेच्या नित्य संपर्कात आहे.
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २३६ वर, बळींची संख्या ५
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:50 AM