नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30 लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 31 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 31 हजार 787 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1008 जणांचा मृत्यू झाला आहे. 22,982 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 7797 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी (29 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 71 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1813 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 218,187 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3,147,623 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 961,871 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Video : खरे हिरो! तब्बल 84 तास रुग्णवाहिकेने 3000 किमी दूर पोहोचवला मृतदेह
Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्ताला रिपोर्ट येण्याआधीच दिला डिस्चार्ज अन्...
Coronavirus : लय भारी! Youtube च्या मदतीने 'या' फुलांपासून तयार केलं स्वस्त आणि मस्त सॅनिटायझर
Coronavirus : बापरे! मास्क लावला नाही तर तब्बल 8 लाखांचा दंड, 'या' देशाने घेतला निर्णय