Coronavirus : देशातील 20 राज्यांत कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 195 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 10:15 AM2020-03-20T10:15:09+5:302020-03-20T10:35:44+5:30
Coronavirus : कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 10,049 वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या शुक्रवारी (20 मार्च) 2,45,670 वर पोहोचली होती. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 10,049 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 88, 441 लोक बरेही झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे.
भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. 163 भारतीयांना आणि 32 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. देशातील 20 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील 20 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक आणि पंजाबमध्ये एक अशा एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
The total number of positive cases of #COVID19 in India now stands at 195 (including 32 foreigners), 4 deaths (1 each) in Delhi, Karnataka, Punjab and Maharashtra: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/0WENTqUXlr
— ANI (@ANI) March 20, 2020
आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पद्दूच्चेरीमध्ये 1, दिल्लीमध्ये 17, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 15, केरळमध्ये 28, महाराष्ट्रात 49, पंजाबमध्ये 2, तेलंगणामध्ये 16, गुजरात 2, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 19, लडाख 10, तमिळनाडू 3, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
PM Narendra Modi on Coronavirus: 'रविवारी पाच वाजता करूया घंटानाद; 'त्या' राष्ट्ररक्षकांना देऊया दाद' #CoronavirusOutbreakindia#NarendraModi#jantacurfewhttps://t.co/MvdlDTSZkQ
— Lokmat (@MiLOKMAT) March 19, 2020
कोरोनाच्या भीतीने इस्राईलमध्ये एका भारतीयाला चिनी समजून मारहाण करण्यात आली आहे. इस्राईलमध्ये एका भारतीय वंशाच्या नागरिकाला चिनी समजून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. इस्राईलमधील स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. शालेम शिंदसोन असं या व्यक्तीचं नाव असून त्याला मारहाण करण्यात आली. शालेम हा चीनचा नागरीक असल्याचा त्यांचा समज झाला. त्यानंतर कोरोना, कोरोना म्हणत दोन व्यक्तींनी शालेम याला बेदम मारहाण केली. 2017 पासून शालेम इस्राईलमध्ये आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Coronavirus: कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू #coronavirusindia#CoronavirusOutbreakindiahttps://t.co/d33cGjRVWo
— Lokmat (@MiLOKMAT) March 19, 2020
कोरोनाचा फटका हा अनेक कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार असून जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बेरोजगारांची संख्या 2 कोटी 50 लाखांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने याबाबत माहिती दिली आहे. संघटनेच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अनेक मोठ्या कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प बंद ठेवले आहेत. आर्थिक संकटामुळे कंपन्यांकडून कामगार कपात केली जाऊ शकते. यामुळे जवळपास 2 कोटी 50 लाख कामगार बेरोजगार होऊ शकतात. मंदी आणि कामगार कपातीने यंदा कामगारांचे 3400 डॉलर्सचे नुकसान होईल असं संघटनेने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने इस्राईलमध्ये भारतीयाला चिनी समजून मारहाण
Coronavirus : कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार, जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार
Coronavirus : संपूर्ण कुटुंबाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, 'या' सरकारने 1 किमीपर्यंत कर्फ्यू लावला!
Nirbhaya Case : 'निर्भया'चे दोषी फासावर लटकल्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोठा संकल्प
Nirbhaya Case : 'निर्भया आज नक्कीच आनंदी असेल, आम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली'