अहमदाबाद - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गुजरातमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचा सामना करण्यात गुजरात सरकार आणि तेथील आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे आरोप होत असतानाच राज्यातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या एक हजारांच्या पुढे पोहोचली आहे. शनिवारी गुजरातमध्ये कोरोनामुळे २७ जणांचा मृत्यू झाला. तसेच काल राज्यात कोरोनाचे ४१२ नवे रुग्ण सापडले.
गुजरातमधील आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारी २७ कोरोनापबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ७ एवढी झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ४१२ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांचा आकडा १६ हजार ३५६ वर पोहोचला आहे. त्याबरोबरच दिवसभरात ६२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या ९ हजार २३० झाली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत दोन लाख ५ हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका अहमदाबाद शहराला बसला असून, शनिवारी या शहरात २८४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अहमदाबादमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ हजार ८८१ एवढी झाली आहे. तसेच शनिवारी येथे २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी
क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...
शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी