CoronaVirus: ...तर दोन थापडा खाशील; ऑक्सीजन सिलेंडर न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 11:17 PM2021-04-22T23:17:19+5:302021-04-22T23:24:54+5:30

पटेल यांनी त्या व्यक्तीला विचारले, 'तुम्हाला कुणी ऑक्सिजन सिलेंडरपासून वंचित ठेवले आहे?' यावर ती व्यक्ती म्हणाली, हो, त्यांनी नाकारले. अम्हाला केवळ पाच मिनिटांसाठीच एक सिलेंडर मिळाले.

CoronaVirus Two slaps threat to man seeking oxygen by union minister prahlad patel कोरोना काळात ही करसली दादागिरी? | CoronaVirus: ...तर दोन थापडा खाशील; ऑक्सीजन सिलेंडर न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यांची धमकी

CoronaVirus: ...तर दोन थापडा खाशील; ऑक्सीजन सिलेंडर न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यांची धमकी

googlenewsNext

भोपाळ - संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आज देशभरातील रुग्णालयांत ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, असे असतानाही लोक आप्तांचा जीव वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, जेव्हा एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील केंद्रीय मंत्र्यांसमोर तक्रार केली, तेव्हा त्याला चक्क उघडपणे धमकीच देण्यात आली. विशेष म्हणजे ही धमी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री प्रह्लाद पटेल यांनी दिली आहे. ऑक्सीजनसाठी हाताश झालेल्या या व्यक्तीला त्यांनी चक्क दोन थापडा मारण्याची धमकी दिली आहे. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

मध्य प्रदेशातील दमोहच्या एका रुग्णालयाबाहेर एका व्यक्तीने मंत्री प्रह्लाद पटेल यांच्याकडे तक्रार केली, की 'अम्ही एवढे हताश आहोत... आम्हाला ऑक्सीजन सिलेंडर मिळाले नाही...' यावर प्रह्लाद पटेल यांनी त्या व्यक्तीला दोन थापडा मारण्याची धमकीच देऊन टाकली. प्रह्लाद पटेल म्हणाले, 'जर असे बोलशील तर दोन खाशील,' हे बोलताना ते संबंधित व्यक्तीकडे पाहून हातवारेही करत होते. प्रहलाद पटेल हे दमोहचे भाजप खासदार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या उद्या बंगालमध्ये होणाऱ्या सर्व सभा रद्द, कोरोनावरील हायलेवल बैठकीत होणार सहभागी

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

पटेल यांनी त्या व्यक्तीला विचारले, 'तुम्हाला कुणी ऑक्सिजन सिलेंडरपासून वंचित ठेवले आहे?' यावर ती व्यक्ती म्हणाली, हो, त्यांनी नाकारले. अम्हाला केवळ पाच मिनिटांसाठीच एक सिलेंडर मिळाले. यापेक्षा नकार दिला असता, ते चांगले झाले असते.'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान उद्या हायलेवल बैठक घेणार  -
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. ते उद्या बंगालमध्ये निवडणूक प्रचार सभा करण्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीवर बैठक घेणार आहेत. ते शुक्रवारी कोरोनासंदर्भातील एका हायलेवल बैठकीत सहभागी होतील, असे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे. मात्र, बंगाल भाजपच्या विनंतीवरून मोदी सायंकाळी 5 वाजता व्हर्च्यूअली सभांना संबोधित करणार आहेत.
 

Web Title: CoronaVirus Two slaps threat to man seeking oxygen by union minister prahlad patel कोरोना काळात ही करसली दादागिरी?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.