शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

coronavirus: दिल्लीत दररोज कोरोनाच्या दोन हजारांवर नवीन रुग्णांची पडतेय भर, दोन दिवसांत संख्या लाखावर जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 3:47 AM

डॉ. महेश वर्मा समितीने दिलेल्या अहवालानुसार जुलै अखेरपर्यंत दिल्लीत रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात जाणार असल्याचे नोंदविण्यात आले होते. प

नवी दिल्ली : दिल्लीत कोविड - १९ ची तपासणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र त्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या वाढत नसल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करीत असले तरी दररोज दोन ते अडीच हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे, हे येथील वास्तव आहे.डॉ. महेश वर्मा समितीने दिलेल्या अहवालानुसार जुलै अखेरपर्यंत दिल्लीत रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात जाणार असल्याचे नोंदविण्यात आले होते. परंतु केजरीवाल यांनी केंद्र सरकार सोबत नियोजन करून कोविड - १९ ला समर्पित रुग्णांलयात बेडची संख्या वाढविण्यात आली. पंचतारांकित हॉटेल्स खासगी रुग्णालयांना जोडण्यात आलीत. १३५०० बेड कोविड- रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेत. त्यात हॉटेमधील बेडची संख्या ३५०० हजार झाली आहे. दिल्ली सरकारच्या रुग्णालयातील चार हजार बेडसवर आॅक्सिजनची व्यवस्था  करण्यात आलेली आहे. जे रुग्ण बरे झाले आहेत व दुरुस्त होऊन किमान १४ दिवस झाले असतील आणि ज्यांचे वय १४ ते ६० पर्यंत असेल त्यांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.आज दिल्ली कोविड - १९ चा सामना करण्यासाठी सज्ज आहे. दिल्लीत मोठ्याप्रमाणात तपासण्या सुरू आहेत; परंतु दररोज २ हजारांवर नवीन रुग्णांची भर पडत आहे.24 तासांत दिल्लीत २५२० नवीन रुग्णांची भर पडली. गेले काही दिवस दिल्लीत दररोज २ ते ३ हजार नवीन रुग्ण नोंदविले जातात. शनिवारी सकाळपर्यंत कोविड-१९ रुग्णांची एकूण संख्या ९४,६९५ नोंदविण्यात आली आहे.65,624रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २६ हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.2924दिल्लीत आतापर्यंत रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी होत असल्याच दावा केजरीवाल यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली