CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 05:02 PM2021-08-26T17:02:44+5:302021-08-26T17:04:53+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल.

CoronaVirus union home secy and health secretary will hold virtual meet for rising corona cases in kerala and maharashtra | CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक 

CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक 

Next

नवी दिल्ली - कोरोना महामारीचा धोका अद्यापही संपलेला नाही. केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत कोरोनाचे नवे रुग्ण समोर येतच आहेत. महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि आरोग्य सचिव राजेश भूषण केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हर्च्यूअल बैठक घेणार आहेत. (CoronaVirus union home secy and health secretary will hold virtual meet for rising corona cases in kerala and maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल.

कोरोनावरील लसीच्या बुस्टर डोसची किती गरज? AIIMS चे संचालक डॉ. गुलेरियांनी स्पष्टच सांगितलं

केरळची स्थिती -
दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री व्ही मुरलीधरन गुरुवारी म्हणाले, की केरळ सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मात्र, राज्य सरकारचे लक्ष मोपला बंडाच्या वर्धापन दिनावर आहे. केरळमध्ये बुधवारी तब्बल 31,445 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर, केरळमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3,883,429 वर पोहोचली आहे. तर 215 रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांचा आकडा 19,972 वर पोहोचला आहे. तसेच संक्रमण दर वाढून 19.03 टक्के झाला आहे. यापूर्वी, केरळमध्ये एकाच दिवसात 30,000 हून अधिक रुग्ण 20 मे रोजी नोंदविले गेले होते. तेव्हा एकाच दिवसात 30,491 नवे रुग्ण समोर आले होते. 

CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित
       
महाराष्ट्राची स्थिती -
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 5 हजार 031 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत 216 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 4 हजार 380 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 47 हजार 414 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण 50 हजार 183 इतकी आहे. 

Read in English

Web Title: CoronaVirus union home secy and health secretary will hold virtual meet for rising corona cases in kerala and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.