नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक-3 जाहीर केला आहे. यासाठी सरकाच्या वतीने नवीन नियमावलीही जारी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने जारी केल्या या नियमावली प्रमाणे (गाईडलाइन्स) 5 ऑगस्टपासून जिम खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच बरबोर सरकारने नाईट कर्फ्यूदेखील हटवला आहे. मात्र, या काळात मेट्रो, रेल्वे आणि चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत. 1 ऑगस्टपासून अनलॉक-3 संपूर्ण देशात लागू होईल.
याशिवाय, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी सविस्तर चर्चा करून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 31 ऑगस्टपर्यंत बंदच राहतील, असा निर्णयही घेण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, स्वातंत्र्यता दिनाचे कार्यक्रम सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळूनच केले जातील. याच बरोबर इतर आरोग्य विषयक प्रोटोकॉल्सचेही पालन करावे लागेल (जसे, की मास्क लावणे), असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
या नियमावली प्रमाणे वंदे भारत मिशनअंतर्गत मोजक्या संख्येने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचीही परवानगी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसदर्भात सरकार नंतर निर्णय घेणार आहे. मेट्रो रेल्वे, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, थिएटर्स, बार, ऑडिटोरिअम, असेम्बली हॉल पूर्वीप्रमाणेच बंद राहतील. तसेच, कंटेनमेन्ट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन सुरूच राहील. सरकारच्या वतीने जी सूट देण्यात आली आहे. ती कंटेनमेंट झोनच्या बाहेर देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनसाठी घालण्यात आलेले निर्बंध जशास तसेच असतील.
गृह मंत्रालयाने सांगितले, की आज जारी करण्यात आलेली ही नियमावली राज्यांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या फिडबॅकवर आधारलेली आहेत. तसेच यासंदर्भात संबंधित मंत्रालये आणि विभागांशीही सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या नियमावलीत 65 वर्षांहून अधिक वय असलेल्यां नागरिकांना, आजारांशी संघर्ष करत असलेल्यां नागरिकांना, गर्भवती महिलांना आणि 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. लग्न समारंभांत 50 हून अधिक लोकांनी सहभागी होण्यास परवानगी नसेल. तसेच अंत्यविधीसाठीही 20 हून अधिक लोकांनी एकत्र येण्यास बंदी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन
आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करून शकतं राफेल
सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...
Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी
CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर