Coronavirus : 'कोरोनासाठी लॉकडाऊन गरजेचे मात्र अंमलबजावणीची पद्धत चुकीची'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 03:02 PM2020-04-02T15:02:35+5:302020-04-02T15:26:06+5:30
Coronavirus : सोनिया गांधी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक घेतली.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे भारतात 58 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 2000 वर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी ‘लॉकडाऊन’सह सरकार योजत असलेल्या सर्व उपायांना काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल, अशी ग्वाही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात दिली होती. त्यानंतर आता कोरोनासाठी डॉकडाऊन गरजेचे होते, मात्र त्याच्या अंमलबजावणीची पद्धत चुकीची असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांनी गुरुवारी (2 एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाचे संकट रोखण्यासाठी देशभरात डॉकडाऊन गरजेचे होते, मात्र त्याची अंमलबजावणीची चुकीच्या पद्धतीने झाली आहे. यामुळे देशातील लाखो स्थलांतरीत मजुरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच देशभरात चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या असून या समस्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला आता व्यापक रणनीती आखण्याची आवश्यकता असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Congress Working Committee (CWC) meeting being held via video conferencing. Party Interim President Sonia Gandhi, Former Prime Minister Dr. Manmohan Singh, Rahul Gandhi, and other senior leaders are attending the meeting. (Picture Source - All India Congress Committee) pic.twitter.com/QiqwIC9bD8
— ANI (@ANI) April 2, 2020
'देशापुढे आज कोरोनाचं मोठे संकट उभे आहे, मात्र त्याला हरवण्यासाठी इच्छाशक्ती मोठी असायला हवी. कोरोनाशी सामना करणारे डॉक्टर्स, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सरकारने पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना सूट, एन 95 मास्क अशा गरजेच्या वस्तू लवकरात लवकर पुरवल्या गेल्या पाहिजेत' असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच आरोग्याच्या आणि मानवी संकटाच्या काळात ही बैठक पार पडली. आमच्या पुढे भय निर्माण करणारी परिस्थिती आहे, परंतु या समस्येचा पराभव करण्याचा संकल्प त्याहून मोठा असायला हवा असंही त्यांनी म्हटलं आहे.
To fight #COVID19, there is no alternative to constant & reliable testing. Our doctors, nurses, & health workers need all the support. Personal Protection Equipment such as hazmat suits, N-95 masks must be provided to them on a war footing: Congress Interim President Sonia Gandhi https://t.co/nwYwcvyGKb
— ANI (@ANI) April 2, 2020
सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना याबाबत एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये कोरोना साथीने लागण होणाऱ्यांचे जीव धोक्यात येण्याखेरीज गरीब व वंचित वर्गातील लाखो कुटुंबाचे जगणेही संकटात आले आहे. अशा वेळी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण देशाने एकजुटीने उभे राहण्याची व प्रत्येक नागरिकाने देशाप्रती व माणुसकीप्रती असलेले कर्तव्य निष्ठेने बजावण्याची नितांत गरज आहे. 21 दिवसांचे ‘लॉकडाऊन’ हे स्वागतार्ह पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी TikTok चा पुढाकार, 100 कोटींची केली मदत
Coronavirus : चिंताजनक! जगभरात तब्बल 9,36,204 कोरोनाग्रस्त; इटली, स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू
Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला...
Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू
Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त