शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

CoronaVirus Updates: चिंता वाढली...! 24 तासांत जगात सर्वाधिक नवे कोरोना बाधित भारतात; अशी आहे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:38 PM

कोरोना महामारीच्या प्रारंभापासून आतापर्यंत देशभरात एकूण 3 कोटी 27 लाख 37 हजार कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 4 लाख 38 हजार 210 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढायला सुरुवात झाली आहे. रविवारी जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण भारतात आढळून आले. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने ताजी आकडेवारी जाहीर केली. यानुसार, गेल्या 24 तासांत देशात 42,909 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 380 कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, गेल्या 24 तासांत 34,763 लोकांनी कोरोनावर मात केली, म्हणजेच काल 7766 सक्रिय रुग्णांची वाढ झाली आहे. (coronavirus update 30 august 2021 today new corona cases deaths recovery in India)

वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, भारतात काल सर्वाधिक कोरोना रुग्ण समोर आले. याशिवाय, अमेरिकेत 37262, इंग्लंडमध्ये 33196, इराणमध्ये 31516, जपानमध्ये 22748 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच काल रशिया, मॅक्सिको, इराण आणि इंडोनेशियामध्ये भारतापेक्षा कमी मृत्यूची नोंद केली गेली आहे.

कोरोनाचा नवीन AY.12 व्हेरिएंट? शास्त्रज्ञांची चिंता वाढली 

अशी आहे भारताची स्थिती -कोरोना महामारीच्या प्रारंभापासून आतापर्यंत देशभरात एकूण 3 कोटी 27 लाख 37 हजार कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 4 लाख 38 हजार 210 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 23 हजार लोक कोरोनातून बरेही झाले आहेत. सध्या देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 76 हजार कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

एकूण कोरोना रुग्णांची संख्या - 3 कोटी 27 लाख 37 हजार 939एकूण डिस्चार्ज - 3 कोटी 19 लाख 23 हजार 405एकूण सक्रिय रुग्ण - 3 लाख 76 हजार 324एकूण मृत्यू - 4 लाख 38 हजार 210एकूण लसीकरण - 63 कोटी 43 लाख 81 हजार डोस देण्यात आले

बापरे! डोळे आणि फुफ्फुसांनंतर आता कोरोना कानावर करतोय 'अटॅक'; ऐकण्याची क्षमता होतेय कमी

भारतातील कोरोना रुग्ण वाढण्याचे मुख्य कारण केरळ -केरळमध्ये सलग चार दिवस तब्बल 30 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित समोर आल्यानंतर, रविवारी 29,836 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. यानंतर केरळमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 40 लाख 7 हजार 408 वर पोहोचली आहे. तर गेल्या एका दिवसात कोरोनामुळे 75 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढू 20,541 वर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाEnglandइंग्लंडrussiaरशियाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल