देशात कोरोनाच्या लाटेने रौद्र रुप धारण केले असून गेल्या २४ तासांत जवळपास अ़डीच लाख नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. हा आकडा काल सापडलेल्या रुग्णांपेक्षा २७ टक्क्यांनी जास्त आहे. बुधवारी 1,94,720 नवे कोरोनाबाधित सापडले होते.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. अनेक राज्यांत सध्या निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरी देखील कोरोनाच्या रुग्णांची वाढ होतच आहे. शनिवार, रविवार आला की सोमवार, मंगळवारी रुग्ण संख्या कमी दिसत आहे, परंतू सोमवारी, मंगळवारी टेस्टिंग करणाऱ्यांचा आकडा बुधवार, गुरुवारी कमालीचा वाढत आहे. यामुळे रुग्णसंख्या देखील वाढत आहे.
देशात गेल्या 24 तासांत 2,47,417 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 84,825 बरे झाले आहेत. देशात सध्या 11,17,531रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट हा 13.11% वर गेला आहे. तर ओमायक्रॉनचे एकूण 5,488 रुग्ण सापडले आहेत. तर 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात लस टंचाई...राज्यात कोव्हॅक्सिन लसीची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हास्तरावरून यावर विचारणा होत आहे. केंद्रीय मंत्र्यांना कळविले आहे. ५० लाख डोस कोव्हिशिल्ड आणि ४० लाख कोव्हॅक्सिनचे डोस हवे आहेत, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.