कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला रुग्ण कमी झाल्याचे दिसत असताना बुधवारी अचानक मोठी वाढ झाली. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार दिवसाला २.६४ लाख नवे रुग्ण सापडले आहेत. हा आकडा गुरुवारपेक्षा ६.७ टक्क्यांनी अधिक आहे. काही तज्ज्ञांना दक्षिण आफ्रिकेप्रमाणे कोरोनाची ही तिसरी लाट लगेचच ओसरेल असे वाटत आहे. तर काहींना ही लाट आणखी वाढेल असे वाटत आहे.
दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयाचे संचालक डॉ सुभाष गिरी म्हणतात की पॉझिटीव्हीटी रेटसह, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील सतत वाढेल. पॉझिटीव्हीटी रेट अनेक घटकांवर अवलंबून असतो. तुम्ही किती चाचण्या केल्या आहेत, दुसरे म्हणजे, तुमच्या पॉझिटिव्ह नमुन्यांची प्रकरणे किती गंभीर आहेत तसेच लोकांची स्किल कशी आहेत, यावर ठरतो.
जसा जसा पॉझिटीव्हीटी रेट वाढत जाईल तसा कोरोना रुग्णांचा आकडाही वाढत जाणार आहे. येत्या काळात पॉझिटीव्हीटी रेटच्या दुप्पट पॉझिटीव्ह रेट पहायला मिळू शकतो. जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तिसऱी लाट उच्चांकावर असू शकते, मार्चमध्ये ही लाट ओसरू शकते. मात्र, या काळात अनेक लोक कोरोनाबाधित होऊ शकतात, अशी भीती गिरी यांनी व्यक्त केली आहे.
मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ विवेक नांगिया म्हणतात की, तिसरी लाट उच्चांकावर पोहोचणे खूप धोकादायक आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आता रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पॉजिटिविटी सीटमध्ये वाढ झाल्याने हे घडत आहे. आता हा आजार अशा लोकांना जास्त होत आहे ज्यांना कॉमोरबिडीटीची समस्या आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी मिळून काळजी घेणे आवश्यक आहे. कारण थोडासा निष्काळजीपणाही खूप जीवघेणा ठरू शकतो.
दिल्ली मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष अरुण गुप्ता यांनी 31 डिसेंबर रोजी आलेल्या यूकेच्या डेटाचा हवाला देत सांगितले की, यूकेमधील प्रत्येकाला केवळ लसीचे दोन्ही डोस मिळालेले आहेत, तसेच बूस्टर डोसदेखील मिळाले आहेत. संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये गंभीर मृत्यू किंवा रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांनी कमी झाल्याचे डेटा विश्लेषण दाखवते. यामुळे लसीकरण प्रभावी आहे, हे दिसते.