नवी दिल्ली/ मुंबई: गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 903 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 51 हजार 209 वर पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 252 दिवसांनी सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 36 लाख 97 हजार 740 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिवसभरात 311 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 59 हजार 191 वर पोहोचला आहे.
राज्यात आज 1,078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 095 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 53 हजार 581 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के आहे. राज्यात सध्या 15 हजार 485 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,91,497 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 919 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 28 , 43, 792 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात याच महिन्यात 100 टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिलेदेखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.