नवी दिल्ली: देशभरात गेल्या 24 तासांत 27 हजार 254 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 219 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 3 लाख 74 हजार 269 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 37 हजार 687 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 47 हजार 032 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 32 लाख 64 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 42 हजार 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 47 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 74 हजार 269 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यात रविवारी दिवसभरात 3 हजार 623 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 64 लाख 97 हजार 877 झाली आहे तर, दिवसभरात 2 हजार 972 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात 63 लाख 5 हजार 788 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत तर, सध्या राज्यभरात सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजार 400 इतकी आहे.
राज्यात आज दिवसभरात 46 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा आहे. तर, आतापर्यंत एकूण 1 लाख 38 हजार 148 नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 59 लाख 79 हजार 898 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 97 हजार 877 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत तर, सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 207 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, 1 हजार 892 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
केरळात वाढता प्रादुर्भाव, 20 हजार नव्या रुग्णांची नोंद-
केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 20,240 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 43 लाख 75 हजार 431 वर पोहोचला आहे. तसचे 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या वाढून 22,551 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 15 हजार 575 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. तर संसर्गाचा दर 17.51 टक्के इतका आहे.