नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात ३१,३८२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०० हजार १६२ वर पोहोचली. तर गेल्या २४ तासांत ३२,५४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२८,४८,२७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात गुरुवारी ३ हजार ३२० कोरोनाबाधित रुग्ण आणि ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ४ हजार ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत ६३ लाख ५३ हजार ७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३९ हजार १९१ रुग्ण उपचाराधीन आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७६ लाख ४६ हजार ५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ६१ हजार ८४२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ४६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के आहे, तर मृत्युदर २.१२ टक्के आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ३४ हजार ५५७ असून, मृतांची संख्या १ लाख ३८ हजार ७२५ इतकी आहे.
मुंबईत गुरुवारी ४९७ रुग्णांची नोंद-
मुंबईत गुरुवारी ४९७ रुग्णांची नोंद झाली असून पाच मृत्यूची नोंद झाली आहे. ३९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ३९ हजार ७६१ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या १६ हजार ६८ वर पोहोचली आहे. सध्या ४ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याची संख्या ७ लाख १६ हजार ५११ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत १६ ते २२ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के असल्याची नोंद आहे.