Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 03:20 PM2021-08-27T15:20:00+5:302021-08-27T15:25:15+5:30
देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी 36 हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील 79 टक्के नवे कोरोना रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत.
नवी दिल्ली - केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या 24 तासांत, देशात 44 हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 496 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 32,988 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी 36 हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील 79 टक्के नवे कोरोना रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत. (Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again)
केरळमध्ये 31 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 162 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, महाराष्ट्रात 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आगहेत, तर 159 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख 44 हजारांच्या पुढे गेली आहे. यातच, कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता असून ती नोव्हेंबरमध्ये पीकवर असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
India reports 44,658 new #COVID19 cases,32,988 recoveries and 496 deaths in the last 24 hrs, as per Health Ministry.
— ANI (@ANI) August 27, 2021
Total cases: 3,26,03,188
Total recoveries: 3,18,21,428
Active cases: 3,44,899
Death toll: 4,36,861
Total vaccinated: 61,22,08,542 (79,48,439) in last 24 hrs pic.twitter.com/3Ekda2cKBP
अशी आहे देशातीक कोरोना स्थिती -
गेल्या 24 तासांमधील एकूण नवीन कोरोना बाधित - 44,658
गेल्या 24 तासांमधील एकूण बरे झालेले रुग्ण - 32,988
गेल्या 24 तासांमधील एकूण मृत्यू - 496
गेल्या 24 तासांमधील कोरोना लसीकरण - 79.48 लाख
देशात सक्रिय रुग्णांची संख्या - 3. 44 लाख
एकूण संक्रमित लोक - 3.26 कोटी
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 3.18 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू - 4.36 लाख
आतापर्यंत एकूण कोरोना लसीकरणाचा आकडा - 61.22 कोटी
केरळात कोरोनाचा कहर कशामुळे? महाराष्ट्राला धोका किती?
या पाच राज्यांत सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण -
केरल- 31,645
महाराष्ट्र- 5,131
आंध्र प्रदेश- 1,622
तमिळनाडू- 1,604
कर्नाटक- 1,224