नवी दिल्ली - केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या 24 तासांत, देशात 44 हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 496 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 32,988 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी 36 हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील 79 टक्के नवे कोरोना रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत. (Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again)
केरळमध्ये 31 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 162 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, महाराष्ट्रात 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आगहेत, तर 159 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख 44 हजारांच्या पुढे गेली आहे. यातच, कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता असून ती नोव्हेंबरमध्ये पीकवर असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
अशी आहे देशातीक कोरोना स्थिती -गेल्या 24 तासांमधील एकूण नवीन कोरोना बाधित - 44,658गेल्या 24 तासांमधील एकूण बरे झालेले रुग्ण - 32,988गेल्या 24 तासांमधील एकूण मृत्यू - 496गेल्या 24 तासांमधील कोरोना लसीकरण - 79.48 लाखदेशात सक्रिय रुग्णांची संख्या - 3. 44 लाखएकूण संक्रमित लोक - 3.26 कोटीआतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 3.18 कोटीआतापर्यंत एकूण मृत्यू - 4.36 लाखआतापर्यंत एकूण कोरोना लसीकरणाचा आकडा - 61.22 कोटी
केरळात कोरोनाचा कहर कशामुळे? महाराष्ट्राला धोका किती?
या पाच राज्यांत सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण -केरल- 31,645 महाराष्ट्र- 5,131 आंध्र प्रदेश- 1,622 तमिळनाडू- 1,604 कर्नाटक- 1,224