शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

Coronavirus Updates: हलगर्जीपणामुळे पुन्हा तेच संकट येण्याची शक्यता; टास्क फोर्सच्या अध्यक्षांचा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 4:53 AM

लॉकडाऊनची वर्षपूर्ती : मास्क वापरा, सामाजिक अंतर राखा : डॉ. व्ही.के. पॉल यांचे आवाहन

एस.के. गुप्तानवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट आणि डबल म्युटंट व्हेरिएंटमुळे विशेषज्ञ काळजीत असून, किंचितही हलगर्जीपणा घातक सिद्ध होऊ शकतो. लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले. लोकांनी योग्य मास्क वापरावा, साबणाने हात धुवावेत, सामाजिक अंतर राखावे. याशिवाय लस घेण्यासाठी को-विन ॲपवर नोंदणी करून लसीकरण मोहिमेत भाग घ्यावा, असे आवाहन कोविड-१९ टास्क फोर्सचे अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी केले.

डॉ. पॉल म्हणाले, ‘कोरोनाची पुन्हा लाट येण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांनी योग्य पद्धतीने मास्क न वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन न करणे होय. याच कारणांमुळे राज्य सरकारांना सणांवर स्थानिक प्रतिबंध लावण्यास सांगण्यात आले आहे. थोडासा हलगर्जीपणा घातक सिद्ध होऊ शकतो.’

डॉ. पॉल कोरोनाच्या डबल म्‍युटंट व्हेरिएंटविषयी बोलताना म्हटले की, आतापर्यंत हेच समजले आहे की, ‘नवा स्‍ट्रेन परिणामकारक असला तरी बहुधा सुपरस्‍प्रेडर नाही. तो घातक असल्याचे पुरावे अजून मिळालेले नाहीत. वैज्ञानिक आणखी काही माहिती मिळाल्यानंतर सांगू शकतील. कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटवर लस परिणाम करणार नाही, असे कारण अजून तरी दिसलेले नाही.  नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे  संचालक डॉ. सुजितकुमार सिंह म्हणाले की, ‘विषाणूचा एक जेनेटिक कोड असतो. त्याला एक प्रकारचा मॅन्युअल समजावे. विषाणूच्या जेनेटिक कोडमध्ये सतत लहान-लहान बदल होत असतात. बहुतांश बदल निष्क्रिय असतात; परंतु काही बदलांमुळे विषाणू वेगाने पसरतो किंवा घातक ठरू शकतो. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटला जास्त संक्रमक आणि घातक मानले जात आहे.’

डॉ. सिंह म्हणाले की, ‘ज्या राज्‍यांत रुग्ण वाढताहेत तेथे वेगळ्या म्‍युटेशन प्रोफाइलचा पत्ता लागला आहे. जो नवा ‘डबल म्‍युटंट’ व्हेरिएंट आहे तो जवळपास १५-२० टक्के नमुन्यांत मिळाला आहे. हा आधीच कॅटलॉग केलेल्या व्हेरिएंटशी जुळत नाही. तो महाराष्‍ट्रातील २०६ आणि दिल्लीतील ९ नमुन्यांत आढळला.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या