- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना साथरोगाच्या दुसऱ्या लाटेतील मृतांच्या संख्येबाबत अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने दिलेले वृत्त फेटाळून लावत सरकारी आकडा अगदी बरोबर आहे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेली आकडेवारी तथ्यहीन असून भ्रामक आहे, तर भारत सरकारची आकडेवारी अत्यंत पारदर्शक आहे, असेही त्यांनी सांगितले.डिसेंबरमधील सीरो सर्व्हेचा हवाला देत तयार करण्यात आलेल्या अहवालात देण्यात आलेला मृतांचा आकडा पूर्णत: चुकीचा आहे. लसीबाबत ते म्हणाले की, जुलैपर्यंत लसीचे ५१.६ कोटी डोस मिळालेले असतील. स्पुतनिक, फायझर आणि अन्य लसीही उपलब्ध होतील. फायझरशी बोलणी चालू आहे. या कंपनीने सरकारसमक्ष आपली बाजू मांडली आहे, त्यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे.
Coronavirus: अमेरिकी वृत्तपत्राचा ‘तो’ दावा केंद्र सरकारने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 8:08 AM