नवी दिल्ली: अमेरिकेतील व्हाइट हाऊसने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर फॉलो केले होते. मात्र आता पुन्हा नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर अनफॉलो केले असल्याचे समोर आले आहे. भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देऊन मदतीचा हात पुढे केला होता. भारताच्या या मदतीनंतर व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह भारताचे पाच महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. पंरतु आता पुन्हा सर्वांना अनफॉलो केले असल्याचे समोर आले आहे.
व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, भारताचे दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे दूतावास यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली होती. मात्र पुन्हा अनफॉलो केल्यमुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याचप्रमाणे भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियावर टीकाही करण्यात येत आहे.
अमेरिका इतर कोणत्याही देशांच्या किंवा त्या देशातील प्रमुखांना ट्विटरवर फॉलो करत नाही. परंतु भारतातील काही महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो केले होते. मात्र आता अमेरिकेतील महत्वाच्या व्यक्तींशिवाय इतर कोणत्याही देशातील प्रमुखांना फॉलो करत नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाची गरज होती. तेव्हा अमेरिकेसह अन्य विविध देशांना भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध देऊन मदत केली होती. मात्र यानंतर देखील अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध निरुपयोगी ठतर असल्याचा दावा देखील अमेरिकेने केला होता. त्यामुळे हे औषध निरुपयोगी ठरल्यामुळे अमेरिकेने यू-टर्न घेतला की काय असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
'किम जोंगच्या प्रकृतीबद्दल माझ्याकडे योग्य माहिती आहे, पण...'; डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा
''बरं ते जॅकेट कायमचं उतरलंय की हा ‘Lockdown Look’ आहे?''