सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचंही मोफत लसीकरण (Free Vaccine for 18 to 44 Years) करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या भूमिकेबाबत यू-टर्न पाहायला मिळाला आहे. आपणही लस घेणार असून ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावं, असं अखिलेश यादव म्हणाले. "जनआक्रोश पाहता अखेर सरकारनं अखेर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत राजकारण करण्याऐवजी ते लसीकरण करतील अशी घोषणा केली. आम्ही भाजपच्या लसीच्या विरोधात होतो. परंतु आम्ही भारत सरकारच्या लसीचं स्वागत करतो. आम्हीदेखील लस घेणार आहोत आणि ज्या लोकांचं लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण झालं नाही त्यांनादेखील लस घेण्याचं आवाहन आम्ही करत आहोत," असं अखिलेश यादव म्हणाले. मुलायम सिंह यांनीदेखील घेतली लसउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिह यादव यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. यानंतर मुलायम सिंह यादव यांचा फोटो ट्वीट करत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती.अखिलेश यादव यांनी केला होता विरोध यापूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर प्रश्न उपस्थित करत विरोध केला होता. "भाजपची लस घेणार नाही," असं अखिलेश यादव म्हणाले होते. "मी भाजपच्या लसीवर कसा भरवसा करू शकतो. जेव्हा आमचं सरकार स्थापन होईल तेव्हा सर्वांना मोफत लस दिली जाईल. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही," असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच सर्वांचं मोफत लसीकरण केलं जावं असं ते म्हणाले होते.
"आम्ही पण लस घेणार..."; कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरून अखिलेश यादव यांचा यू-टर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 2:42 PM
Covid 19 Vaccine : यापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा भाजपची लस असा उल्लेख केला होता. लसीकरणावरून आता त्यांनी घेतला यू-टर्न
ठळक मुद्देयापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा भाजपची लस असा उल्लेख केला होतालसीकरणावरून आता त्यांनी घेतला यू-टर्न