नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. यातच एक चांगली बातमी आली आहे. देशात आजपासून पहिल्या स्वदेशी लशीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यावरील परीक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) एका पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते. यावेळी देशातील कोरना व्हायरसवरील लशींसंदर्भात माहिती देण्यात आली.
यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर पॉल यांनी सांगितले, की सध्या तीन कोरोना लशींवर काम सुरू आहे. या सर्व लशी, परीक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. यावेळी त्यांनी माहिती दिली होती, की या तीन लशींपैकी एका लशीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण आज-उद्या सुरू करण्यात येईल. मात्र, त्यांनी या लशीच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. तसेच इतर दोन लशी प्रत्येकी परीक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर आहेत.
सध्या देशात, भारत बायोटेक-ICMR च्या कोव्हॅक्सिन (Covaxin), झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी (Zykov-D) आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशील्ड (Covishield) या तीन लशी परीक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. भारतात कोविशिल्डचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सीरम इंडियाद्वारे केले जाणार आहे.
पहिली लस 'कोव्हॅक्सिन' - हैदराबाद येथील भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सोबतीने, देशातील पहिली स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या मानवी परीक्षणाला सुरुवात केली आहे.
दुसरी लस - 'झायकोव्ह-डी' -अहमदाबाद येथील फार्मास्युटिकल कंपनी झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डीचेही मानवी परीक्षण सुरू आहे. पुढील वर्षापर्यंत लस लॉन्च होऊ शकते असे कंपनीने म्हटले आहे.
तिसरी लस - 'कोविशील्ड'पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आणि एस्ट्रा जेनेकाने विकसित केलेल्या लशीचे भारतात परीक्षण सुरू करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची परवानगी घेतली आहे. कोविशील्ड(Covishield) असे या लसीचे नाव आहे.
तत्पूर्वी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लाल किल्ल्यावरून भारतात तीन लशींवर काम सुरू आहे, अशी माहिती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर