नवी दिल्ली - देशात कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यापासून कोरोनाला रोखण्यासाठीच्या विविध उपायांचा अवलंब सुरू झाला आहे. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात वापरला जाणारा एन-९५ मास्क कोरोनाविरोधातील प्रभावी हत्यार म्हणून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. घराबाहेर पडताना एन-९५ मास्कचा लोकांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, त्यामुळे या मास्कची मागणीही वाढली आहे. मात्र आता या एन-९५ मास्कच्या वापराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा मास्क कोरोनाचा फैलाव रोखण्याच्याबाबतीत निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत विविध राज्ये आणि केंद्रशासित राज्यांना पत्र लिहून वापराबाबत सूचना केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक राजीव गर्ग यांनी याबाबतचे पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माधयमातून व्हॉल्व्ड रेस्पिरेटर लावलेल्या मास्कबाबत इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकारचा मास्क कोरोनाचा फैलाव रोखू शकत नाही. तसेच ही बाब कोविड-१९ ला रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या विपरित आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
एन-९५ मास्कचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी सामान्य लोकांकडून करण्यात येत आहे. तसेच या मास्कचा वापर हा चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. विशेषकरून असे एन-९५ मास्क वापरले जात आहेत जे छिद्रयुक्त आहेत. त्यांच्यामध्ये व्हॉल्व्ड रेस्पिरेटर बसवलेला आहे.
अशा प्रकारचे छिद्रयुक्त मास्क कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अगदी विरुद्ध आहेत. कारण या छिद्रातून कोरोना विषाणू बाहेर येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मी आग्रह करतो की, राज्यांनी फेस आणि माऊथ कव्हरच्या वापराचे पालन करण्याबाबत आदेश द्यावेत, तसेच एन-९५ मास्कच्या चुकीच्या वापराला थांबवावे, अशी सूचना गर्ग यांनी केली आहे.
दरम्यान, नाक आणि तोंडाच्या माध्यमातून होऊ शकणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने एप्रिल महिन्यात काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चेहरा आणि तोंड झाकण्यासाठी सुती कपड्यापासून तयार केलेल्या प्रोटेक्टिव्ह कव्हरचा वापर करण्याबाबतचा सल्ला देण्यात आला होता. तसेच गरम पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्या पुनर्वापरास हरकत नसल्याचेही सांगण्यात आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी