वाराणसी – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकांच्या मनात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोक मृतदेह घेण्यासही पुढे येत नाहीत. वाराणसीच्या महाश्मशान मणिकर्णिका घाटावर एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्याला नकार देण्यात आला. त्यामुळे मतदेह चितेवर सोडूनच लोकांनी पळ काढला. जवळपास १ तासाच्या या गोंधळानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी वाराणसीच्या चौक ठाणे परिसरात एका महिलेचा मृतदेह घेऊन लष्कराच्या वर्दीत काही जवान पोहचले. महिलेचा मृतदेह पूर्णपणे झाकण्यात आला होता. त्याचसोबत नातेवाईकांसह अन्य लोकांनी पीपीई किट्स घातले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात मृतक कोरोना संक्रमित असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. अशावेळी मृतदेह घाटावर पोहचल्यानंतर तो चितेवर ठेऊन अंत्यसंस्कार करणारे सगळे जण पळू लागले. त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.
मृतकाचे नातेवाईक आणि अंत्यसंस्कार करणारे यांच्यात जवळपास १ तास गोंधळ सुरु होता. त्यानंतर नातेवाईकांना पोलिसांना याबाबत सूचना केली. काही वेळाच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृत व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र चेक केल्यानंतर महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचं उघड झालं. मृत महिलेचा भाऊ वाराणसी येथे लष्करात जवान असल्याने काही जवान लष्कराच्या गणवेशात आले होते.
पोलीस निरिक्षक राकेश सिंह यांनी सांगितले की, वाराणसी कंन्टोन्मेंट झोन येथील ३९ जीटीसी हवालदार सचिन थापा यांची बहीण तारादेवी हिचा मृत्यू झाला होता. त्यांना रक्ताच्या उलट्या होत होत्या. बीएचयू हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ब्रेन हेमरेजमुळे शनिवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. रविवारी मृतदेह मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कारासाठी आणताना मृतदेह कपड्याने झाकण्यात आला होता. यावेळी कोरोना संक्रमित मृतदेह असल्याची अफवा पसरली. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हा गोंधळ संपुष्टात आणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, अंत्यसंस्कार करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, ज्याप्रकारे मृतदेह झाकण्यात आला होता आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी गणवेश घातलेला पाहून हा मृतदेह कोरोनाग्रस्ताचा असल्याचं वाटलं. पण पोलिसांनी मृत्यू प्रमाणपत्र पाहिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास आम्ही तयार झालो. त्यामुळेच सुरुवातीच्या काही काळ यावरुन गोंधळ निर्माण झाला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोना संबधित रहस्यमय रोगाचा लहान मुलांना धोका; अमेरिकेसह अनेक देश चिंतेत!
मजुरांच्या मदतीला धावली ‘लालपरी’; आतापर्यंत ८ हजार जणांना पोहचवलं इच्छितस्थळी
आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!
पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?
येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट