कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. भातात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 29,000 हून अधिक झाली आहे. तर 900 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. पोलीस देखील अनेकांसाठी देवदूत ठरत आहेत. याच दरम्यान आणखी एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. याच दरम्यान पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये एकट्या असलेल्या एका आजोबांना वाढदिवसाचं भन्नाट सरप्राईज दिलं आहे. पोलिसांनी केक आणून आजोबांच्या वाढदिवस साजरा केला. अशा प्रकारे अनोखं गिफ्ट मिळाल्याने आजोबांही भावूक झाले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. मिळलेल्या माहितीनुसार, करण पूरी असं आजोबांचं नाव असून ते निवृत्त ऑफिसर आहेत.
हरियाणातील पंचकुलामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पोलिसांनी आजोबांच्या बिल्डिंगखाली सोशल डिस्टन्सिंग राखत त्यांचा वाढदिवस साजरा केला. कमिशनर ऑफ पंचकुला यांनी याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांना हातात केक घेतलेला पाहून करण पुरी यांना अश्रू अनावर झाले. करण पूरी यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पंतकुल पोलिसांचे कौतुक केले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'इतना सन्नाटा क्यूँ है भाई?'; यूपीतील साधूंच्या हत्येनंतर काँग्रेसचे भाजपाला १० खोचक प्रश्न
Coronavirus : कनिका कपूर कोरोनाग्रस्तांना देऊ शकत नाही रक्त, 'हे' आहे कारण
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या
Coronavirus : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही
Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत आशेचा किरण, देशात 'ही' औषधं देत आहेत व्हायरसला टक्कर