Coronavirus : ...म्हणून आमदाराने धरले डॉक्टरचे पाय, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 02:44 PM2020-04-24T14:44:26+5:302020-04-24T14:54:26+5:30

Coronavirus : भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 21,000 हून अधिक झाली आहे.

Coronavirus Video puducherry congress mla special thanks to doctors SSS | Coronavirus : ...म्हणून आमदाराने धरले डॉक्टरचे पाय, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

Coronavirus : ...म्हणून आमदाराने धरले डॉक्टरचे पाय, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 21,000 हून अधिक झाली आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. डॉक्टरही आपल्या कुटुंबापासून दूर राहून कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका आमदाराने डॉक्टरांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचे एका आमदाराने पाय धरल्याची घटना समोर आली आहे. आमदाराने डॉक्टरला नमस्कार केला आणि त्याचे आभारही मानले आहेत. पद्दुचेरीमध्ये ही घटना घडली पद्दुचेरीच्या अरियांकुप्पम विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार टी. जयमूर्ती यांनी कोरोनाविरूद्ध लढा देणार्‍या डॉक्टरांचं कौतुक केलं आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्ण कोरोनाग्रस्तांसाठी झटणाऱ्या डॉक्टरांचे पाय धरले आणि नमस्कार करून जयमूर्ती यांनी त्यांचा सन्मान केला आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. उमा मधूसूदन असं या भारतीय वंशाच्या डॉक्टरचं नाव असून त्या सध्या साऊथ विंडसरमध्ये राहतात. उमा मधूसूदन यांनी अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले असून त्यातील अनेक जण बरे झाले आहेत. उमा यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा अमेरिकेतील लोकांनी अनोख्यारितीने सन्मान केला आहे. तब्बल 100 गाड्यांच्या ताफ्यासह त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेतील लोकांनी गाड्यांचे हॉर्न वाजवत त्यांचा सन्मान केला. या कौतुकास्पद घटनेचा एक व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाला आहे. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या 21 हजारांहून अधिक झाली आहे. तर तब्बल 681 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान काही दिलासादायक घटना समोर येत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असताना काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही तीन राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. त्यानंतर आता आणखी एक राज्य कोरोनामुक्त झालं आहे. त्रिपुरा हे राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केली आहे.


 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनापासून सूर्यकिरणे तारणार, व्हायरस क्षणात नष्ट होतो; अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये पाणी टंचाई, विद्यार्थ्यांनी 4 दिवसांत खोदली विहीर

Coronavirus : आनंदाची बातमी! आणखी एक राज्य कोरोनामुक्त, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू

 

Web Title: Coronavirus Video puducherry congress mla special thanks to doctors SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.