रामपूर - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात कोरोनाग्रस्तांची संख्या 23 लाखांहून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. तसेच इतरही अनेक लोक मदतीसाठ तत्पर आहेत. मात्र लॉकडाऊन दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सॅनिटायझेशन करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
कोरोनाचा सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर, पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना समोर येत असतानाच उत्तर प्रदेशमध्ये सॅनिटायझेशनचं काम करणाऱ्या तरुणाची सॅनिटायझर पाजून हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. सॅनिटायझेशनवरून वाद झाल्यावर काही लोकांनी तरुणाला जबरदस्तीने सॅनिटायझर पाजलं. त्यामुळे तरुणाची प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामपूर जिल्ह्यातील मोतीपूरा गावात सॅनिटायझेशन करण्यात येतं होतं. त्यावेळी तेथील काही लोकांच्या अंगावर सॅनिटायझरचे काही थेंब उडाले. यातून वादाला सुरुवात झाली. पुढे या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. गावातील काही तरुणांनी सॅनिटायझेशन करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच जबरदस्तीने सॅनिटायझर पाजलं. यानंतर तरुणाची प्रकृती बिघल्याने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच ते अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत, रुग्णांचा आकडा 7,38,792 वर
Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर ठरला देवदूत
Coronavirus : धोका वाढला! देशात एका दिवसात 2154 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 16,000 वर
Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईन