कोलकाता - पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य कोरोना संक्रमित आहेत. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांनी घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना दक्षिण कोलकात्यातील वुडलँड या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (CoronaVirus West bengal corona infected former chief minister buddhadeb bhattacharyas condition worsens hospitalized)
सांगण्यात येते, की आज बुद्धदेव भट्टाचार्य यांची ऑक्सिजन लेवल 88 वर आली होती. यानंतर डॉक्टरांनी बुद्धदेव यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. बुद्धदेव भट्टाचार्य आणि त्यांची पत्नी मीरा भट्टाचार्य हे कोरोना संक्रमित झाले आहेत. मीरा भट्टाचार्य यांना यापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे.
डॉक्टरांच्या चमूची रिस्क घेण्याची इच्छा नव्हती -बुद्धदेव भट्टाचार्य गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आहेत. कोरोनाचे माइल्ड सिम्ट्मस असल्याने त्यांनी घरीच उपचार घेण्याचे ठरविले होते. यानंतर डॉक्टरांचा एक चमू त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेऊन होता. मात्र, आज सकाळी बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्याची इच्छा नव्हती. यामुळेच बुद्धदेव भट्टाचार्य यांना समजावून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुःखाचा डोंगर! कोरोनामुळे आईचा मृत्यू, 4 मुलं झाली अनाथ; 7 वर्षांच्या अंकुशवर आली कुटुंबाची जबाबदारी
सध्या पश्चिम बंगालमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाचे कोरोनाने निधन झाले आहे.