शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

coronavirus: ना पॅकेज, ना प्लॅन; १७ मेनंतर करणार काय? सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 1:02 PM

लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

ठळक मुद्दे17 मेनंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे? अशी विचारणा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारकडे केली आहे.कोरोनाचा सामना करत असताना वयस्कर, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणेही गरजेचे आहे,कोरोनामुळे राज्यांसमोरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान, लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 17 मेनंतर काय आणि कशी वाटचाल असणार? 17 मेनंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे? अशी विचारणा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारकडे केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.   

यावेळी काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही आपली मते मांडली. कोरोनाचा सामना करत असताना वयस्कर, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणेही गरजेचे आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तर माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यांच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे राज्यांसमोरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. तसेच या परिस्थितीतीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.  

या बैठकीला उपस्थित असलेल्या राजस्थान, पंजाब, छत्तीसगड आणि पुदुचेरीच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राज्यांना मदत पॅकेज देण्याची मागणी केली.  ‘ जोपर्यंत व्यापक मदत पॅकेज दिले जात नाही, तोपर्यंत राज्य आणि देश कसा चालेल. आम्ही १० हजार कोटींचा महसूल गमावला आहे. राज्य सरकारांना मदतीबाबत पंतप्रधानांना वारंवार विनंती केली. पण पंतप्रधानांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले.  

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘सोनियाजी म्हणतात त्याप्रमाणे लॉकडाऊन ३.० नंतर काय? सरकारकडे पुढच्या परिस्थितीबाबत काय योजना आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतरच्या धोरणाबाबत माहिती असले पाहिजे.’

दरम्यान, या बैठकीस उपस्थित असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारच्या दृष्टीकोनावर टीका केली आहे. तर राज्याला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. तर पंजाबप्रमाणेच पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी कोरोनाच्या झोननुसार विभागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधी