तज्ज्ञांकडून सातत्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका असेल, असेही तज्ज्ञांकडून सूचित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने प्रत्येक राज्याकडून अतिदक्षता विभागासह मुलांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या २२ उपकरणांविषयीची माहिती मागवून घेतली आहे...
राज्यांकडे आकडेवारीच उपलब्ध नाही बाल हक्क आयोगाने प्रत्येक राज्याला एका अर्जाचा विहित नमुना पाठवला आहेया अर्जात काही रकाने दिले आहेत ज्यामध्ये लहान मुलांवरील उपचाराशी संबंधित वैद्यकीय सेवा, उपकरणे, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, डॉक्टरांची संख्या, नर्सची संख्या इत्यादीची माहिती भरायची होतीहे रकाने भरताना राज्यांना काही तोशीस पडली नाहीपरंतु शून्य ते २८ दिवसांच्या मुलांसाठी आवश्यक असलेल्या निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट्सची संख्या, पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट्सची संख्या, गंभीर अवस्थेतील मुले रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांच्यासाठी किती खाटा उपलब्ध असतील त्यांची संख्या, लहान मुलांसाठी तयार केलेल्या रुग्णवाहिकांची संख्या याशिवाय ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स, नेब्युलायझर्स, ऑक्सिमीटर, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर्स, रेडिएंट वॉर्मर इत्यादींची संख्या किती याची अचूक माहिती अनेक राज्यांना देता आली नाही
तिसऱ्या लाटेचा धोका किती मुलांना -२०११च्या जनगणनेनुसार ० ते ४ वयोगटातील मुलांची संख्या देशात ११ कोटीहून अधिक आहे-५ ते ९ वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटी आहे. तर १० ते १४ वयोगटातील मुुलांची संख्या १० कोटी एवढी आहे-२०१९ मध्ये जारी करण्यात आलेल्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमनुसार भारतात २५ वर्षे वयाखालील लोकसंख्येचे प्रमाण - ही सर्व आकडेवारी लक्षात घेता भारताच्या एकूण ३५ ते ३८ टक्के लोकसंख्येला तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे स्पष्ट होतेतयारी कितपत- इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते लहान मुलांसाठीची आरोग्य व्यवस्था भिन्न असतेत्यांच्यासाठी व्हेंटिलेटर, आयसीयू व इतर सर्व वैद्यकीय उपकरणांची रचना वेगळी असते, हे सर्व आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीतसेच कोरोाबाधित मुलांवर उपचार करण्यासाठी लहान मुलांच्या डॉक्टरांबरोबरच स्वतंत्र प्रशिक्षित नर्सेसचीही आवश्यकता भासणार आहेएकूणच तिसऱ्या लाटेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने आतापासूनच जय्यत तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले