नवी दिल्ली - देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रोजच्या रोज दोन लाखहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर येत आहेत. यामुळे सरकार लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अनेक लोक असेही आहेत, जे भारतात लस घेण्याऐवजी नेपाळमध्ये जाऊन चिनी कोरोना लस घेत आहेत. हे लोक नेमके, असे का करत आहेत, हे जाणून आपणही अवाक व्हाल! (CoronaVirus why the Indian people going to nepal to get chinese corona vaccine)
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या बुधवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका रुग्णालयातील कर्मचारी लस घेण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या हातात सूटकेस पाहून चकित झाले. त्यांना शंका आल्यानंतर त्यांनी त्या लोकांकडे ओळख पत्राची मागणी केली. यानंतर या लोकांनी त्यांना भारतीय पासपोर्ट दाखवला. यावर, तेथील कर्मचाऱ्यांनी या लोकांना लस देण्यास नकार दिला. यानंतर, हे लोक तेथेच भांडणावर आले. मात्र, भारत सोडून हे लोक लस घेण्यासाठी तेथे का पोहोचले? याचा खुलासा झाल्यानंतर रुग्णलय प्रशासनालाही मोठा झटका बसला. खरे तर, चिनी दूतावासाने आपल्या वेबसाइटवर चीनमध्ये प्रवेशासाठी जी तरतूद केली आहे, त्यात जे लोक चीनमध्ये तयार झालेली लस घेतली, केवळ त्यांनाच चीनसाठी व्हिसा देण्यात येईल, असे म्हटले आहे. यामुळे जे भारतीय लोक व्यवसाय अथवा इतर काही कामानिमित्त चीनमध्ये जात आहेत, ते लोक चिनी लस घेण्यासाठी नेपाळमध्ये जात आहेत. भारतात चिनी लस वापरण्याची परवानगी नाही.
CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...! बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूच्या टेकू रुग्णालयाचे संचालक सागर राज भंडारी यांनी म्हटले आहे, की त्यांना यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नव्हते. असे लोक समोर आल्यानंतर, लसीकरणाचा यासाठी दुरुपयोग होत असल्याचे समोर आले आहे. कारण हे लोक कोरोनापासून बचावासाठी नाही, तर चीनमध्ये जाण्यासाठी लस घेत आहेत. यावर नेपाळच्या अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे, की चिनी कंपन्यांसोबत व्यापार करणारे भारतीय व्यापारी आपल्या कर्मचाऱ्यांना चीनमध्ये पाठविण्यासाठी या प्रकारचा अवलंब करत आहेत. यामुळेच ते केवळ चिनी लसच घेऊ इच्छित आहेत. सध्या भारतात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचे लसीकरण सुरू आहे. याच बरोबर स्पुतनिक - V या रशियन लशीलाही इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!