Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 09:25 AM2020-04-18T09:25:59+5:302020-04-18T09:34:11+5:30

Coronavirus : कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक घटना समोर आली आहे.

Coronavirus woman travels 2700 km across 6 states to meet son in hospital lockdown SSS | Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास

googlenewsNext

तिरुवनंतपूरम - कोरोनाच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 3 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक घटना समोर आली आहे. आपल्या आजारी मुलासाठी एका आईने तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आजारी मुलाला भेटण्यासाठी एका आईने 6 राज्यांतून तीन दिवस 2700 किलोमीटरचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने सून आणि नातेवाईकासोबत कारने हा प्रवास पूर्ण केला आहे. अरुण कुमार असं या महिलेच्या मुलाचं नाव आहे. अरुण बीएसएफमध्ये असून सध्या राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. काही दिवसांपासून अरुण आजारी असल्याने जोधपूरमधील एम्सच्या डॉक्टरांनी फोन करून याबाबत त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. मुलाच्या आजारपणाची माहिती मिळताच त्याची आई शिल्लमा वासन अस्वस्थ झाल्या. 

मुलाची काळजी त्यांना सतावत होती. त्यामुळेच त्यांनी मुलाला भेटण्याचा निर्णय घेतला. सून आणि नातेवाईकाला सोबत घेऊन त्यांनी कारने प्रवास करायचं ठरवलं. केरळमधून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात असा प्रवास करत त्या राजस्थानमध्ये पोहोचल्या आणि मुलाला भेटल्या. सध्या अरुण यांच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून कोणत्याही अडचणीशिवाय राजस्थानमध्ये आलो, याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी आईच्या अंत्यसंस्कारासाठी एका जवानाला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याची घटना समोर आली होती. संतोष यादव असं जवानाचं नाव असून त्यांना आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. संतोष छत्तीसगड सशस्त्र दलात कार्यरत आहेत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असतानाच त्यांच्या आईचे उत्तर प्रदेशमध्ये निधन झाले. मात्र लॉकडाऊनमध्ये रेल्वेसेवा बंद असल्याने जवानाला तीन दिवसांचा प्रवास करावा लागला. आईच्या अंत्यसंस्कारासाठी उत्तर प्रदेशातील सिखड या गावी पोहोचण्यासाठी 1100 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

‘कोरोना’ विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम हवा; विधी तज्ज्ञांचे मत

 

Web Title: Coronavirus woman travels 2700 km across 6 states to meet son in hospital lockdown SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.